सोपान उर्फ काका चव्हाण

मा. नगरसेवक, पुणे महानगरपालिका

अध्यक्ष, खडकवासला विधानसभा मतदारसंघ

मा. सभासद – पुणे म.न.पा.
मा. सभासद – स्थायी समिती
अध्यक्ष – धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान
अध्यक्ष – धारेश्वर नागरी सह. पतसंस्था
अध्यक्ष – रेणुका फाऊंडेशन, सिंहगड रोड, पुणे
अध्यक्ष – पुणे जिल्हा ग्रंथालय संघ
उपाध्यक्ष – कै. चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण व क्रीडा मंडळ
कार्याध्यक्ष – कै. चंद्रकांत दांगट पाटील सार्वजनिक वाचनालय शासनमान्य (तालुका ‘अ’ वर्ग)

प्रभाग क्र. ५४

राजकीय

            राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष स्थापनेपासून आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ना. जयंतरावजी पाटील साहेब व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षामध्ये सक्रीय आहे.

           मी प्रथम पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, २००२-२००७ मध्ये पुणे महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, प्लँनिंग कमिटी सदस्य या नात्याने ‘वडगाव–धायरी’ परिसरामध्ये अनेक विधायक विकासकामे केली. मला इथे नमूद करताना आनंद होतो आहे की ‘राजाराम पूल ते माणिकबाग’ (सिंहगड रोड) या रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभही याच काळात झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा, ‘अध्यक्ष’ या नात्याने पक्ष संघटनेबरोबरच मतदारसंघातील ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीपर्यंत अगदी सचोटीने पक्षाचे काम करत आलो आहे.

शैक्षणिक

              ग्रामीण भागातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने १९९९ मध्ये, आमच्या कुटुंबियांच्या व मित्र परिवाराच्या मदतीने, ‘धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान‘ची स्थापना धायरी परिसरामध्ये केली. फक्त ४ मुलींपासून सुरु झालेल्या संस्थेची वाटचाल, आज तब्बल ६५०० पेक्षा जास्त विद्यार्थी, अत्यंत चांगल्या दर्जाचे शिक्षण या संस्थेच्या विविध शाखांमधून घेत आहेत. ‘उद्यमेन ही सिद्ध्यन्ति कार्याणि नि मनोरथे ‘ हे ब्रीद समोर ठेऊन संस्थेची आता २५व्या अमृतमहोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल होत आहे. हेच संस्कार विद्यार्थ्यांवर घडवले जात आहेत. मराठी, सेमी इंग्लिश व इंग्रंजी माध्यमातून कन्याशाळा, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय अशा विविध संस्थांमार्फत हा शिक्षण यज्ञ अखंडपणे चालू आहे. संस्थेमार्फत नव्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. 
          आमचे वडील कै.बंडोजी खंडोजी चव्हाण यांनी आमच्यावर नेहमीच प्रामाणिकपणाचे व श्रमाला महत्त्व देणारे संस्कार घडवले. ‘कष्ट हे केलेच पाहिजेत, त्यातूनच तुम्ही तुमचा उज्ज्वल भविष्यकाळ घडवू शकता.‘ असे त्यांचे मत होते. कष्टाचे, सचोटीचे संस्कार घडविणाऱ्या माता-पित्यांचे ऋण या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सर्व चव्हाण परिवार, मित्र व हितचिंतकांच्या सहाय्याने फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे.

सामाजिक

          सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात माझे काम अविरतपणे सुरूच आहे. भविष्यातील या क्षेत्रात येणाऱ्या अडचणींचे निवारण करून, या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी, मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे आणि प्रयत्नशील राहणार आहे. ‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा‘ या उक्तीप्रमाणे आजतागायत माझी वाटचाल चालू आहे. हे करताना आपले आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा, आपले सहकार्य कायमच मला लाभले, याची मला जाणीव आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या आपल्या परिसरामध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत आहे, परंतु अजुनही अनेक मुलभूत सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाहीत. यापूर्वीही विविध विकासकामे मार्गी लावली आहेत, अजूनही खूप काही करावयाचे बाकी आहे. येणाऱ्या काळात आपले आशीर्वाद, शुभेच्छा, सहकार्य सदैव राहील हीच अपेक्षा, हीच विनंती

फोटो गॅलरी

मीडिया गॅलरी

संपर्क

ऑफिस – कै. चंद्रकांत दांगट उर्फ चंदर पाटील सार्वजनिक वाचनालय, माधुरी-मिलिंद कॉम्प्लेक्स,
अभिरुची मॉल समोर, वडगाव बु,
पुणे-४११०४१

७८७५७ ८५०५१
९४२२० ८३९२१
संपर्क साधा